ज्योतिबाच्या नावानं चांग भलं

April 16, 2011 12:13 PM0 commentsViews: 6

16 एप्रिल

दख्खनचा राजा अशी ख्याती असणार्‍या जोतीबाच्या चैत्र यात्रेला आजपासुन सुरवात झाली आहे. ज्योतिबा यात्रेचा मुख्य दिवस उद्या असून मानाच्या सासनकाठ्या डोंगरावर दाखल होत आहे. ज्योतिबाच्या मानाच्या 101 सासनकाढ्या आहेत. त्यापैकी बर्‍याच सासनकाठ्या डोंगरावर यायला सुरुवात झाली आहे.

उद्या रविवारी यात्रेचा मुख्य दिवस असल्याने कर्नाटक, आंध्रप्रदेश, गुजरात,महाराष्ट्रातील भावीक मोठ्या संख्येन डोंगरावर मोठ्या दाखल झालेत. या यात्रेसाठी पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहेत. उद्या पहाटे 3 वाजता मंदिराचा दरवाजा उघडण्यात येईल. त्यानंतर चार वाजता पाद्यपूजा, काकड आरती आणि शासकीय महाभिषेक होईल. ज्योतिबाची राजेशाही थाटातील पगडी पूजाही बांधण्यात येणार आहे. यात्रेचं मुख्य आकर्षण असणार्‍या सासनकाठ्यांची मिरवणूक दुपारी एक वाजता गुलाल- खोबर्‍याची उधळण करत काढण्यात येईल.

close