शिवसैनिकांनी जयराम रमेश यांचा पुतळा जाळला

April 16, 2011 10:38 AM0 commentsViews: 2

16 एप्रिल

रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर येथे शिवसैनिकांनी जयराम रमेश यांचा पुतळा जाळला. पर्यावरण मंत्री जयराम रमेश यांनी जैतापुर अणुउर्जा प्रकल्पाबाबत कोणताही पुनर्विचार होणार नाही असं जाहीर केलं. यानंतर जैतापूर प्रकल्प हद्दपार करणाची घोषणा करणार्‍या शिवसेनेने आज राजापूर आणि लांजा या ठिकाणी रमेश यांच्या वक्तव्याचा निषेध करीत त्यांचे पुतळे जाळले. यावेळी शिवसेना आमदार राजन साळवी यांना अटक करण्यात आली. त्यांच्याबरोबरच 40 ते 50 शिवसेना कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली.

close