मालेगाव स्फोटाप्रकरणी गुजरातमध्ये आश्रमावर एटीएसची धाड

November 9, 2008 12:28 PM0 commentsViews: 5

9 नोव्हेंबर, गुजरात मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात दहशतवादविरोधी पथकानं स्वामी असीमानंद यांच्या शबरी आश्रमावर धाड टाकली आहे. गुजरातमधील डांग जिल्ह्यातल्या आश्रमावर ही धाड टाकण्यात आली आहे. एटीएसच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार स्वामी असीमानंद हे त्यांचा ड्रायव्हर सुनील दहवाडच्या सीम कार्डवरून साध्वी प्रज्ञासिंगच्या संपर्कात होते, असा संशय एटीएसला आहे. आश्रमातल्या तपासणीचं काम पूर्ण झालं आहे. दरम्यान, काही राजकारणी मालेगाव प्रकरणावर भाषणबाजी करून एटीएसवर दबाव आणण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी मुंबईत केला. ' एटीएसला आपलं काम करू दिलं पाहिजे. कोणी साधू असो, साध्वी असो किंवा लष्करातला अधिकारी, पोलीस त्यांना मिळालेल्या पुराव्यांनुसार कारवाई करणार ', असं आर. आर. पाटील यांनी पुढे सांगितलं.

close