चेन्नईचा विजय ; बंगलोरची पराभवाची हॅट्‌ट्रीक

April 16, 2011 4:45 PM0 commentsViews: 1

16 एप्रिल

आयपीएल 4 मध्ये महेंद्रसिंग धोणीच्या चेन्नईनं सुपर विजय मिळवला आहे. चेन्नई रॉयल चॅलेंजर्सने बंगलोरचा 22 रन्सनं पराभव केला. या स्पर्धेतला बंगलोरचा हा सलग तिसरा पराभव ठरला आहे. चेन्नई सुपर किंग्जने पहिली बॅटिंग करत 183 रन्स केले. विजयाचे आव्हान समोर ठेऊन खेळणार्‍या बंगलोरची टीम 7 विकेटच्य मोबदल्यात 162 रन्स करु शकली.

बंगलोरची सुरुवातच खराब झाली. ओपनिंगला आलेला तिलकरत्ने दिलशान पहिल्याच ओव्हरमध्ये शुन्यावर आऊट झाला. मॉर्केलनं त्याची विकेट घेतली. मयांक अग्रवाल, सौरभ तिवारी, चेतेश्वर पुजारा हे प्रमुख बॅट्समनही आज फ्लॉप ठरले. बंगलोरतर्फे एबी डिव्हलिअर्सने एकाकी झुंज देत 64 रन्स केले. पण टीमला विजय मिळवून देण्यात तो अपयशी ठरला. चेन्नईचा स्पर्धेतला दुसरा विजय ठरला.

close