हसन अली प्रकरणी उत्तर प्रदेशच्या प्रधान सचिवांची हकालपट्टी

April 16, 2011 4:47 PM0 commentsViews: 4

16 एप्रिल

घोडेव्यापारी हसन अलीशी संबंध असल्याच्या आरोपावरुन आज उत्तर प्रदेशच्या प्रधान सचिवाला आणि आयपीएस अधिकार्‍याला पद गमवण्याची वेळ आली आहे. मुख्यमंत्री मायावती यांनी प्रधान सचिव विजय शंकर पांडे यांची हकालपट्टी केली. त्यांच्या जागी आता प्रशांत त्रिवेदी नवे प्रधान सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली. तसेच आयपीएस अधिकारी जसबिर सिंग यांनाही त्यांच्या पदावरून काढण्यात आलंय.

close