"लक्ष पुरा करके रहूंगी "!

April 16, 2011 5:13 PM0 commentsViews: 3

16 एप्रिल

भारताची फुटबॉलपटू सोनू सिन्हाला समाजकंटकांनी चालत्या रेल्वेतून ढलकल्यानंतर तीला पाय गमावावा लागला होता. या आघातातून सोनू आता सावरत आहे. तीच्यातील जिद्दीला आयबीएन लोकमतचा हा सलाम.

"लक्ष पुरा करके रहूंगी" सोनूच्या या शब्दाशब्दातून आत्मविश्वास आणि अफाट जिद्दीचा प्रत्यय येतोय. हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असलेल्या 23 वर्षीय सोनुच्या शरिरावरील जखमा भरून येतील , पण फुटबॉलपटू व्हायच्या तीच्या स्वप्नांच काय ?

राष्ट्रीय स्तरावराच्या या महिला फुटबॉलपटूला आता गरीब मुलांसाठी फुटबॉलचे प्रशिक्षण केंद्र सुरू करायचंय. ग्रामीण भागातून आलेल्या सोनुला फुटबॉलपटू होण्यासाठी कुटुंबीयांचा आणि समाजाचा विरोध सहन करावा लागला होता. पण जिद्दीन तिने त्यावर मात केली होती.

सोनूवरील हा हल्ला भ्याड होता. या हल्यात सोनूला पाय गमावावा लागला असला तरी तीला आयुष्यात पुन्हा नवी उमेद देण्यासाठी अवघा देश तीच्या पाठीशी उभा राहीला. पण सरकारकडून तीला आतापर्यंत मिळाळीत ती फक्त आश्वासनचं.

फुटबॉल खेळण्यासाठी सोनुला पहिल्यांदा स्वकियांशीच लढावे लागले आणि ते फुटबॉल खेळण्याचे स्वप्न साकार होत असतानाच तीच्यावर हा हल्ला झाला. पण आता या लढाईत एकटी नाही. अवघा देश तीच्या सोबत आहे एवढं नक्की.

close