पुणे वॉरिअर्सचा पुणेरी थाट !

April 16, 2011 5:30 PM0 commentsViews: 3

16 एप्रिल

आयपीएल सीझन चारमध्ये यावर्षी दोन नवीन टीम दाखल झाल्या आणि यातली एक टीम आहे पुण्याची पुणे वॉरिअर्स इंडिया. आयपीएलची पहिली मराठी टीम असं या टीमला म्हटलं जातं. पण टीम स्वत:ला प्रमोट करतेय देशी टीम म्हणून खेळाडू जेव्हा मैदानात उतरतात तेव्हा टीमचं देशीपण दिसतं त्यांच्या चिअर गर्ल्समध्ये. पुणे टीमच्या चिअरगर्ल्स मिनी स्कर्ट न घालता चक्क भारतीय वेशभूषेत दिसतात. आणि त्यांचं नृत्यही पारंपरिक भारतीय शैलीतलं आहे. मराठी लावणी, मोहिनी अट्टम किंवा बंगाली शैलीत नाच करत त्या टीमसाठी चिअर करतात.

close