शनिवार पेठेत सापडली सोन्याची पुरातन नाणी

November 9, 2008 11:27 AM0 commentsViews: 168

9 नोव्हेंबर पुणे,पुण्यातल्या शनिवार पेठेत जवळपास साडे आठशे सोन्याची पुरातन नाणी सापडली आहेत. एका जुन्या वाड्याच्या खोदकामात मजुरांना ही नाणी सापडली. शनिवार पेठेतल्या गाडगीळ शाळेत मागच्या बाजूस स्विमिंग टँकसाठी खोदकाम सुरू होतं. त्योवळी तीन मजुरांना सोन्याची नाणी असलेला हंडा सापडला. त्यांनी यातली 422 नाणी खडकीमधल्या एका सोनाराला विकली. त्यांची किंमत जवळपास 22 लाख रुपये आहे. गुन्हे शाखेच्या दरोडा प्रतिबंधक पथकाला याची टीप मिळाल्यानंतर त्यांनी या तिघांना ताब्यात घेतलं. सोनारालाही ताब्यात घेऊन त्याच्याकडची नाणी पोलिसांनी हस्तगत केली आहेत. या नाण्यांपैकी काही नाणी रोमन भाषेत आहेत. तर उर्दू भाषेतल्या मुद्रा अकबराच्या काळातल्या म्हणजेच पंधराव्या शतकातल्या असण्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.

close