पंजाब इलेव्हनचा डेक्कन चार्जर्सवर विजय

April 16, 2011 6:02 PM0 commentsViews: 2

16 एप्रिल

आयपीएलमध्ये किंग्ज इलेव्हननं सलग दुसर्‍या विजयाची नोंद केली आहे. किंग्ज इलेव्हनने डेक्कन चार्जर्सचा 8 विकेट आणि 14 बॉल राखून पराभव केला. ऑलराऊंड कामगिरी करणारा पॉल वॉल्थटी किंग्ज इलेव्हनच्या विजयाचा हिरो ठरला. पहिली बॅटिंग कणार्‍या डेक्कननं 8 विकेट गमावत 165 रन्स केले. डेक्कनतर्फे शिखर धवननं सर्वाधिक 45 रन्स केले. तर किंग्जतर्फे पॉल वॉल्थटीने चार विकेट घेतल्या. वॉल्थटी बॉलिंगमध्ये तर चमकलाच पण बॅटिंगमध्येही त्याने कमाल केली. त्याने 75 रन्सची तुफान खेळी केली. आणि कॅप्टन ऍडम गिलख्रिस्टबरोबर पहिल्या विकेटसाठी 136 रन्सची पार्टनरशिप करत किंग्जच्या विजयाचा पाया रचला. यानंतर अभिषेक नायरनं दोन 4 मारत किंग्जच्या विजयावर शिक्कामोर्तब केला. डेक्कन चार्जर्सचा स्पर्धेतला हा तिसरा पराभव ठरला.

close