भूषण यांच्या संभाषणाची सीडी खोटी !

April 17, 2011 9:07 AM0 commentsViews: 4

17 एप्रिल

जन लोकपाल विधेयकासाठी अण्णांचं आंदोलन तर यशस्वी झालं. पण त्यानंतर वाद मात्र सुरूच आहेत. मसुदा समितीचे सहअध्यक्ष शांतीभूषण यांच्यावरून आता वाद उद्भवला आहे. पण शांती भूषण यांच्या संभाषणाची सीडी खोटी असल्याचे प्रयोगशाळेच्या अहवालावरुन स्पष्ट झाल्याचं अण्णा हजारे यांनी म्हटलंय.

शांती भूषण यांची प्रतिमा मलिन करण्यासाठीच अशाप्रकारे सीडी काढण्यात आल्याची प्रतिक्रियाही त्यांनी दिली. त्यामुळे शांती भूषण यांनी राजीनामा देण्याची गरज नसल्याचंही अण्णा म्हणाले. पण भूषण यांच्या चारित्र्याबद्दल गॅरंटी देऊ शकत नाही, असंही ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी म्हटलंय.

close