पाणीप्रश्नावरून आंदोलन करणार्‍या शेतकर्‍यांसह नेत्यांनाही अटक

April 17, 2011 11:04 AM0 commentsViews: 2

17 एप्रिल

अहमदनगर जिल्ह्यातल्या शेवगाव तालुक्यात पाणीप्रश्नावरून आंदोलन पेटले आहे. आंदोलन करून रास्ता रोको करणार्‍या माजी न्यायमू्र्‌ती बी .जी. कोळसे पाटील, शेतीतज्ज्ञ बुधाजीराव मुळीक आणि बंडातात्या कराडकर यांच्यासह कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. शेवगाव तालुक्यातील ताजनापूर पाणी योजना पूर्ण व्हावी या मागणीसाठी शेतकर्‍यांनी रास्तारोको केला. शेवगाव – बीड रस्त्यावर बंडातात्या कराडकरांनी कीर्तन सुरु केलं होतं. बैलगाड्या, मेंढ्या शेळ्या यांच्यासह हे आंदोलन करण्यात आलं. त्यामुळे रस्त्यावर वाहतूक खोळंबली होती.

close