हेन्री व्हॅनॉयके ठरतोय मॅरेथॉन स्पर्धकांची प्रेरणा

November 9, 2008 12:31 PM0 commentsViews: 4

9 नोव्हेंबर,दिल्ली मॅरेथॉनमध्ये जगातले काही दिग्गज अ‍ॅथलिट्स आपलं वर्चस्व प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करतील. परंतु या मॅरेथॉनमध्ये असेही काही अ‍ॅथलिट्स आहेत ज्याचं आयुष्य इतरांसाठी प्रेरणा ठरलंय. पॅराऑलम्पिकचा गोल्ड मेडल मिळवणारा हेन्री व्हॅनॉयके आणि त्याचा रनिंगमधला जोडीदार जोसेफ किंबुजा ही नावं यापैकीच. हे दोघे मॅरेथॉनमध्ये धावण्यासाठी राजधानीत आले . पण त्यांच्या ट्रेनिंगमधून वेळ काढून ते भेटले काही होतकरू अंध अ‍ॅथलिट्सना. त्यांनी होतकरू अ‍ॅथलिट्सना काही टिप्सही दिल्या.स्वत:बद्दल हेन्री सांगतो, जवळपास एका दशकापूर्वी एप्रिलच्या दुदैर्वी दिवशी त्याला दृष्टी गमवावी लागली होती. 21 वर्षाचा असताना त्याचा असा नव्या जगण्याचा प्रवास पुन्हा एकदा सुरू झाला. त्यावेळी त्याच्या पाठीशी भक्कम उभे होते त्याचे जवळचे मित्र आणि कुटुंबीय.त्याचा जोडीदार जोसेफ हेन्रीबद्दल सांगतो, आपल्या देशाचं प्रतिनिधित्व करणे आणि त्यात चॅम्पियनही होऊन दाखवणं हे हेन्रीचं स्वप्नं होतं. ते त्याने पूर्ण केलंय. म्हणूनच त्याला अंधांचा खरा राजदूत मानलं जातं.

close