सीडीप्रकरणी भूषण यांचा कोर्टात जाण्याचा निर्णय

April 17, 2011 1:38 PM0 commentsViews: 3

17 एप्रिल

जन लोकपाल बिल मसुदा समितीचे सदस्य आणि माजी कायदामंत्री शांती भूषण यांनी सध्या सुरू असलेल्या सीडीप्रकरणात आता सुप्रीम कोर्टात जाण्याचा निर्णय घेतला आहे. ही सीडी म्हणजे अमरसिंग यांच्या 2006 मध्ये तयार करण्यात आलेल्या टेप्सचा भाग असल्याचा दावा शांतीभूषण यांनी केला.

त्याचवर्षी आपले फोन टॅप केले गेल्याचा आरोप अमरसिंग यांनी केला. या सीडीतलं संभाषण संकलन करुन सादर केलं गेलं आहे. यात अमरसिंग यांचं संभाषण घुसवण्यात आलं आहे. असा दावाही शांती भूषण यांनी केला. तसेच उद्या याविरोधात ते सुप्रीम कोर्टात याचिकाही दाखल करणार आहेत.

तर शांतीभूषण यांना बदनाम करण्यासाठीच या सीडीचे प्रकरण काढण्यात आलंय. सीडी मध्ये 6 ठिकाणी बदल करण्यात आले आहेत. सीडी प्रसारित करणं हा सुनियोजित कट आहे असं प्रशांत भूषण यांनी सांगितलं. प्रशांत भूषण नुसतंच स्पष्टीकरण देऊन थांबले नाहीत तर या बदनामीच्या कटात अमर सिंग यांचा हात आहे असा आरोपही त्यांनी केला.

भूषण यांच्या संभाषणाची सीडी खोटी – अण्णा

दरम्यान शांती भूषण यांच्या संभाषणाची सीडी खोटी असल्याचे प्रयोगशाळेच्या अहवालावरुन स्पष्ट झाल्याचं अण्णा हजारे यांनी म्हटलंय. शांती भूषण यांची प्रतिमा मलिन करण्यासाठीच अशाप्रकारे सीडी काढण्यात आल्याची प्रतिक्रियाही त्यांनी दिली. त्यामुळे शांती भूषण यांनी राजीनामा देण्याची गरज नसल्याचंही अण्णा म्हणाले. पण भूषण यांच्या चारित्र्याबद्दल गॅरंटी देऊ शकत नाही, असंही ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी म्हटलंय.

close