विकिलिक्स : डाऊ आंदोलन शमवण्यासाठी आढळराव पाटलांनी केली मध्यस्थी !

April 18, 2011 9:44 AM0 commentsViews: 4

18 एप्रिल

डाऊ केमिकल कंपनीविरुद्ध पेटलेलं आंदोलन थंड करण्यासाठी, शिवसेना खासदार शिवाजीराव आढळराव पाटलंानीच प्रयत्न केले.असा गौप्यस्फोट विकिलीक्सने केला आहे. विधानसभेत नबाब मलिक यांनी स्थगन प्रस्तावाव्दारे हा आरोप केला.

आंदोलन शमवण्यासाठी एजन्सी नेमा, तसेच त्या एजन्सीला पैसे देऊन आंदोलनाची धार कमी करावी यासाठी आढळराव पाटील यांची अमेरिकन कौन्सुलेटसोबत चर्चाही केली, असा गौप्यस्फोट विकिलिक्सने केल्याचा दावा मलिक यांनी केला.

आढळराव पाटील आणि अमेरिकन कौन्सुलेट सोबत 4 बैठका झाल्याचंही मलिक यांनी आरोपात म्हटलंय. दरम्यान आढळराव पाटलांनी हे आरोप फेटाळून लावले आहेत.

डाऊ कंपनीविरोधात वारकर्‍यांनी मोठं आंदोलन छेडलं होतं. त्याला नंतर शिवसेनेने पाठिंबा दिला होता. आता विकिलिक्सचा गौप्यस्फोट आणि मलिक यांनी केलेले आरोप, यामुळे शिवसेनेचे आढळगाव पाटील चांगलेच अडचणीत सापडले आहेत.

close