तंटामुक्त गाव योजना राष्ट्रीय पातळीवर राबवणार – देशमुख

April 17, 2011 2:10 PM0 commentsViews: 9

17 एप्रिल

राज्यात यशस्वी ठरलेल्या संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान आणि महात्मा गांधी तंटामुक्त गाव योजना राष्ट्रीय पातळीवर राबवणार असल्याची घोषणा केंद्रीय ग्रामविकासमंत्री विलासराव देशमुख यांनी मुंबईत केली. या योजना राबवण्यात आर.आर.पाटील याचे सहकार्य घेणार असल्याचंही विलासराव देशमुख यांनी यावेळी सांगितलं. आर.आर. पाटील ग्रामविकासमंत्री असताना महाराष्ट्रात या योजना राबवण्यात आल्या होत्या.मराठवाडा लोकविकास मंचकडून विविध क्षेत्रातील कामगिरीबद्दल मुंबईतल्या रविंद्र नाट्य मंदिरात पुरस्कारांचं वितरण करण्यात आलं. त्यावेळी विलासराव देशमुख यांनी ही घोषणा केली.

close