‘आदर्श’च्या पहिल्या सुनावणीला नगरविकास खात्याला अर्धवट कारभार !

April 18, 2011 10:39 AM0 commentsViews: 2

18 एप्रिल

वादग्रस्त आदर्श घोटाळाप्रकरणी जे.ए.पाटील न्यायालयीन आयोगाची पहिल्या दिवसाची सुनावणी आज संपली.सर्वात आधी एमएमआरडीएचे टाऊन प्लॅनर चंद्रमणी खंदारे आयोगापुढे हजर झाले.त्यांनी आदर्शशी संबंधीत 13 फाईल्स आयोगाला सादर केल्या. त्यानंतर बृहन्मुंबईचे जिल्हाधिकारी सीव्ही ओक,आयोगापुढे हजर झाले. त्यांनी आदर्शशी संबंधित जिल्हाधिकारी कार्यालयाचे रेकॉर्ड सादर करण्याचा प्रयत्न केला.

पण आयोगाला दिलेल्या विहित नमुन्याप्रमाणे रेकॉर्ड नसल्यामुळे पुढच्या सोमवारी संपूर्ण रेकॉर्ड सादर करण्याचे आदेश आयोगाने दिले आहेत. त्यानंतर मुंबई महापालिकेनं सोसायटी संदर्भातील कागदपत्रं कोर्टापुढे सादर केली.

आदर्श घोटाळ्याशी संबधित सुनावणीसाठी जे.ए.पाटील आयोगाने राज्याच्या मुख्य सचिवांना समन्स बजावून राज्य सरकारकडची सगळी माहिती कोर्टाला सादर करयाला सागितली होती. पण मुख्य सचिवांनी राज्याच्या वेगवेगळ्या 27 विभागाना कोर्टासमोर जाऊन माहिती सादर करायला सांगितलं.

त्यानुसार राज्याच्या 6 विभागांनी कोर्टाला माहिती सादर केली. राज्याच्या नगरविकास खात्याने 2 फाईल्स सादर करण्याचा प्रयत्न केला. पण नगरविकास विभागाला सर्व फाईल्स पुढच्या सोमवारी कोर्टासमोर सादर करण्याचे आदेश आयोगाने दिले आहेत.उद्या पुन्हा सकाळी 11 वाजता आयोगाची सुनावणी सुरू होणार आहे.

close