पुणे जिल्हा बँकेच्या गैरव्यवहाराची चौकशी अंतिम टप्प्यात

April 18, 2011 11:27 AM0 commentsViews: 4

18 एप्रिल

बारामती तालुक्यातील सोमेश्वरनगरच्या पुणे जिल्हा सहकारी बँकेच्या शाखेतील 22 कोटी रुपयांच्या गैरव्यवहाराची चौकशी अंतिम टप्प्यात आहे. या प्रकरणी निंबूतच्या सोमेश्वर विकास कार्यकारी सोसायटीचे तत्कालीन अध्यक्ष शहाजीराव काकडे यांच्यासह संचालक मंडळ आणि काही अधिकार्‍यांना जबाबदार धरण्यात आलंय.

2007 ते 2010 दरम्यान सुमारे 824 हेक्टर क्षेत्राच्या बनावट सातबारांच्या आधारे द्राक्ष, डाळिंब, ऊस, वाहनं या कारणांसाठी जिल्हा सहकारी बॅकेच्या सोमेश्वरनगर शाखेतून कोट्यावधी रुपयांचे कर्जवाटप केल्याचा आरोप सोसायटीवर आहे. या गैरव्यवहारा प्रकरणी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी दोषींवर कडक कारवाईचे आदेश यापूर्वीच दिलेले आहेत.

close