हमिदा बाईची कोठी हाऊसफुल्ल

April 18, 2011 11:33 AM0 commentsViews: 8

18 एप्रिल

सुनील बर्वेचं हमिदा बाईची कोठी हाऊसफुल्ल चाललंय आणि हे नाटक पाहायला आल्या होत्या साक्षात विजया मेहता. मूळ हमिदाबाईची कोठीच्या सर्वेसर्वा. गिरगावच्या साहित्य संघ मंदिरात या नाटकाचा प्रयोग झाला आणि प्रयोगाला विजया बाईंची उपस्थिती पाहून सगळे कलाकार एकदम खूश झाले. विजयाबाईंनी जुन्या नाटकात साकारलेली भूमिका आता निना कुलकर्णी करतेय. विजयाबाईंनी नाटकाचा आनंद घेतलाच आणि कलाकारांचंही कौतुक केलं.

close