माफियांच्या हल्यापासून संरक्षण मिळण्यासाठी उपायोजनाची मागणी

April 18, 2011 12:04 PM0 commentsViews: 3

18 एप्रिल

माफियाकडून होणार्‍या हल्यापासून संरक्षण मिळण्यासाठी उपायोजना करण्याची मागणी तहसीलदार संघटनांनी केली. वाशिम जिल्हातील कारंजा लाड इथं तहसीलदार आणि नायब तहसीलदार संघटनेचं अधिवेशन पार पडलं. या अधिवेशनात हा ठराव घेण्यात आला. अमरावती विभागातील, यवतमाळ, अमरावती, अकोला, वाशिम, बुलढाणा या जिल्हातील जवऴपास 250 तहसीलदार या अधिवेशनास उपस्थित होते. वाळू आणि केरोसीन माफियाकडून होणारे हल्ले, अतिरीक्त कामाचा बोजा आणि कमी वेतन यावर या अधिवेशनात सविस्तर चर्चा करण्यात आली आहे.

close