तक्रारीची शहानिशा न करता पोलिसांनी केली विद्यार्थ्यांना मारहाण

April 18, 2011 12:13 PM0 commentsViews: 3

18 एप्रिल

पुण्यात एमपीएससीचा अभ्यास करणार्‍या पाच मुलांना पोलिसांनी बेदम मारहाण केली. रात्री दीडच्या सुमाराला पोलिसांनी या मुलांना मारहाण केली. पण नंतर या मुलांची काहीही चुक नाही हे पोलिसांच्या लक्षात आलं. आणि त्यांनी मुलांना सोडून दिलं.

आकुर्डीतल्या गुरुद्वाराजवळच्या हॉस्टेलमध्ये राहाणारी ही मुलं डी वाय पाटीलमध्ये शिकतात. त्यांच्या शेजारी असलेल्या गर्लस हॉस्टेलसमोर काही तरुण आरडाओरडा करत होते. अशी तक्रार तेथील एका स्थानिकाने केली होती. त्यानंतर पोलीसांनी या मुलांच्या रुममध्ये घुसले आणि त्यांना मारहाण केली. नंतर तक्रार करणार्‍याने ही ती मुलं नाही असं सांगितल्यावर पोलीस निघुन गेले.

close