बिनायक सेन यांची अखेर सुटका

April 18, 2011 12:59 PM0 commentsViews: 2

18 एप्रिल

मानवाधिकार कार्यकर्ते बिनायक सेन यांची जामिनावर सुटका झाली. छत्तीसगडमध्ये रायपूरच्या तुरुंगातून आज संध्याकाळी सातच्या सुमाराला बिनायक सेन बाहेर पडले. बिनायक सेन यांना भेटण्यासाठी तुरुंगाबाहेर त्यांचे नातलग आणि मानवाधिकार कार्यकर्ते जमले होते.

बिनायक सेन यांच्यावरचा देशद्रोहाचा आरोप सिद्ध होऊ शकला नाही त्यामुळे त्यांना जामीन मिळाला. सुप्रीम कोर्टाने 3 दिवसांपूर्वी त्यांना जामीन मंजूर केला होता. सेन यांना नक्षलवादी चळवळीबद्दल सहानुभूती आहे. पण त्यामुळे ते देशद्रोही आहेत असं सिद्ध होत नाही असा निर्वाळा सुप्रीम कोर्टाने दिला आणि त्यामुळेच बिनायक सेन यांची सुटका झाली.

close