वर्धा धरणाचे पाणी औष्णिक प्रकल्पाला देण्याचा निर्णय

April 18, 2011 1:05 PM0 commentsViews: 2

18 एप्रिल

अमरावती जिल्ह्यातील अप्पर वर्धा धरणाचे पाणी इंडिया बुल्स औष्णिक प्रकल्पाला वळतं करण्याचा निर्णय तत्कालीन जलसंपदा मंत्री अजित पवार यांनी घेतला. एकीकडे अमरावती जिल्ह्यातला अनुशेष मोठा आहे. तर दुसरीकडे या धरणासाठी शेतकर्‍यांकरता दिलेल्या पंतप्रधान पॅकेजमधून 300 कोटी रुपयांचा निधी देण्यात आला होता.

2006 साली पीएम पॅकेजचा हा निधी अप्पर वर्धाला मिळाला. त्यामधून धरणाचं काम करण्यात आलं. आणि प्रत्यक्षात 23 हजार हेक्टर म्हणजे 60 हजार एकर शेतीचे पाणी दोन औष्णिक प्रकल्पांना वळतं करण्यात आलंय. याविरोधात हायकोर्टात याचिकाही दाखल केली गेली आहे.

close