अल्पवयीन मुलींवर वाढता अत्याचार चिंतेचा विषय – पारसनीस

April 18, 2011 3:12 PM0 commentsViews: 110

18 एप्रिल

अल्पवयीन मुलींवर होणारे अत्याचार वाढत चालले असून हा चिंतेचा विषय आहे. अशा घटनांना प्रतिबंध घालणं हे मोठे आव्हान असून कायद्यासोबत जागरूकता निर्माण करणे प्रबोधन करण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन राज्याचे पोलीस महासंचालक अजित पारसनीस यांनी केलं.

पुण्यात आयोजित महिला दक्षता समितीच्या सुवर्णमहोत्सवी कार्यक्रमात पारसनीस बोलत होते. स्री-भ्रूण हत्यामुळे विषमता निर्माण होत असून त्यामुळे गंभीर सामाजिक प्रश्न निर्माण होऊ शकतो. परदेशात जाऊनही स्त्री भ्रूण हत्या केल्या जातात. अशा घटनाही कायद्यासोबत प्रबोधनाने रोखल्या पाहिजेत असं मत पारसनीस यांनी व्यक्त केलं.

close