जैतापूरमध्ये पोलिसांच्या गोळीबारात एकाचा मृत्यू

April 18, 2011 5:00 PM0 commentsViews: 3

18 एप्रिल

जैतापूर प्रकल्प विरोध आंदोलनात पोलिसांच्या गोळीबारात एकाचा मृत्यू झाला आहे अशी माहिती गृहमंत्री आर. आर. पाटील यांची विधानसभेत दिली. तरवेज सेहकर असे मृत आंदोलकाचे नाव आहे. नाटे पोलीस स्टेशनवर 500 ते 600 लोकांच्या जमावाने हल्ला केला. तिथे जाळपोळ करण्याचाही प्रयत्न झाला. या जाळोपोळीत पोलीस स्टेशनच दफ्तर अर्धवट जळाले. पोलीस स्टेशनच्या इमारतीचे नुकसान झाले. घटनेच्या वेळी नाटे पोलीस स्टेशन मध्ये फक्त पाचच पोलीस कर्मचारी होते.

तसेच जमवाने काही वाहनं जाळण्याचा प्रयत्न जमावाने केला. जमावाच्या हल्ल्यात एक डीवायएसपी आणि 1 पोलीस काँस्टेबल जखमी झाले आहेत. अशी माहिती आर. आर. पाटील यांनी दिली.

जैतापूरमध्ये शिवसेनेनं आज सकाळी साडे अकरापासून आंदोलन सुरू केलं. या आंदोलनकर्त्यांना पांगवण्यासाठी त्यांच्यावर लाठीचार्ज करण्यात आला होता. पण तरीही आंदोलनकर्त्यांनी आंदोलन सुरुचं ठेवल्यामुळे पोलिसांनी आंदोलकांना पांगवण्यासाठी हवेत गोळीबार केला. पण तरीही दिवसभर हे आंदोलन सुरुच ठेवण्याचा इशारा शिवसेनेनं दिला. जवळपास 50 ते 60 आंदोलकांना आतापर्यंत अटक करण्यात आली आहे. आज सकाळी शिवसैनिकांनी प्रकल्पाच्या ठिकाणी जबरदस्ती घुसण्याचा प्रयत्न केला होता. नाटेगावाच्या पोलीस स्टेशनवर काही मच्छीमार महिलांनी दगडफेक केली आहे.

दरम्यान विरोधकांनी सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. जखमी पोलीस आणि जखमी आंदोलक यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. एका आंदोलकाच्या मृत्यूमुळे आता वातावरण चांगलंच पेटलंय. त्यामुळे यापुढे जाऊन काही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांची ज्यादा कुमक मागवण्यात आली आहे. एवढ्या मोठ्या संख्येने जमाव पोलीस स्टेशनवर चालून आला आणि त्यांना पांगवण्यासाठीच पोलिसांना गोळीबार करावा लागला अशी सरकारची भूमिका आर.आर.पाटील यांनी विधानसभेत मांडली.

घटनाक्रम

स. 11.30 वाजता – आंदोलनाला सुरूवात स. 11.45 वा. – शिवसैनिकांचा प्रकल्पस्थळी घुसण्याचा प्रयत्न, पोलिसांकडून लाठीचार्ज, आंदोलकांकडून दगडफेक दु. 12.30 वा. – आंदोलकांकडून प्रकल्पस्थळी घुसण्याचा प्रयत्न, आंदोलक पोलीस यांच्यात धुमश्चक्री, पोलिसांकडून प्रकल्पस्थळी हवेत गोळीबार दु. 12.30 वा. – डीवायएसपी आणि तीन आंदोलक जखमी दु. 1.30 वा. – नाटे पोलीस स्टेशनवर हल्ला, आंदोलकांकडून दगडफेक, पोलीस स्टेशन जाळण्याचा प्रयत्न दु. 2 वा. – नाटे पोलिसांकडून गोळीबार दु. 3 वा. – सहा आंदोलक गोळीबारात जखमी दु. 3 वा. – शिवसेना आमदार राजन साळवीसह 60 आंदोलक ताब्यात दु. 3.30 वा. – जखमी आंदोलक तबरेज सेहकर याचा मृत्यू संध्या. 5.30 वा. – गोळीबारात जखमी झालेले आंदोलक रत्नागिरीतल्या सिव्हील हॉस्पिटलमध्ये दाखल संध्या. 6 वा. – तबरेजचा मृतदेह पोलीस जीपमधून आणला.सिव्हील हॉस्पिटलमध्ये तणाव संध्या. 6.30 वा. – मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला, मृतदेह ताब्यात घेण्यास नातेवाईकांचा नकार संध्या. 7 वा. – शिवसेनेचा जिल्हाबंदीचा इशारा, जैतापूर आणि परिसरात तणाव

close