मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा – उद्धव ठाकरे

April 18, 2011 6:04 PM0 commentsViews: 5

18 एप्रिल

जैतापूर गोळीबार प्रकरणानंतर मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरेंशी फोनवरून चर्चा केली. मुख्यमंत्र्यांनी स्वतःची प्रतिमा स्वच्छ आहे असं समजू नये असं उद्धव ठाकरे म्हणाले. तरबेजच्या मृत्यूची किंमत पृथ्वीराज चव्हाण सरकारला चुकवावी लागेल असा इशाराही त्यांनी दिला. या सगळ्या प्रकरणाची जबाबदारी स्वीकारून मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी केली.

दरम्यान जैतापूरमध्ये शिवसेनेनं सोमवारी सकाळी साडे अकरापासून आंदोलन केलं होतं. शिवसैनिकांनी प्रकल्पाच्या ठिकाणी जबरदस्ती घुसण्याचा प्रयत्न केला होता. आंदोलनकर्त्यांना पांगवण्यासाठी पोलिसांनी त्यांच्यावर लाठीचार्ज केला. तर आंदोलकांना पांगवण्यासाठी हवेत गोळीबार ही केला. पण तरीही शिवसेनेनं दिवसभर आंदोलन सुरुच ठेवलं. जवळपास 50 ते 60 आंदोलकांना अटक करण्यात आली आहे.

close