सीडी प्रकरणी शांती भूषण यांची अवमान याचिका दाखल

April 18, 2011 6:22 PM0 commentsViews: 3

18 एप्रिल

शांती भूषण यांच्या सीडीचं प्रकरणात आता आणखीनंच गंभीर झालं आहे. शांती भूषण यांनी अमरसिंग यांच्याविरोधात सुप्रीम कोर्टात अवमान याचिका दाखल केली आहे. तसेच याप्रकरणाच्या चौकशीसाठी वेगळ्या टीमची नेमणूक करण्याची मागणीही शांती भूषण यांनी केली.

यानंतर अमरसिंग यांनी ही सीडी खरी असल्याचा दावा करत पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवून पोलिसांना सीडींचा सेटही सोपवला आहे. पण समाजवादी पक्षाने शांती भूषण यांनी क्लीनचीट दिली आहे. तसेच मुलामय सिंग आणि शांती भूषण यांचं संभाषणच कधी झालं नव्हतं असंही स्पष्ट केलंय.

या सगळ्या सीडी प्रकरणावर केंद्रीय गृहमंत्री पी. चिदंबरम म्हणतात की, सध्या एकमेकांवर आरोप करण्याचा हंगाम सुरू आहे. पण काही आरोपांना पुष्टी मिळतेय ही चांगली बाब आहे. प्रतिष्ठाही तितकीच महत्त्वाची आहे. शांतीभूषण यांच्या सीडीप्रकरणात दिल्ली पोलीस मुक्त वातावरणात चौकशी करतील, अशी मला आशा आहे. "

close