रत्नागिरीत ठिकठिकाणी जाळपोळ ; जमावबंदी लागू !

April 19, 2011 9:40 AM0 commentsViews: 1

19 एप्रिल

जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पा विरोधातील आंदोलन चिघळलं आहे. उद्या सकाळी 9 वाजेपर्यंत रत्नागिरीत जमावबंदी लागू करण्यात आली आहे. रत्नागिरीचे एसपी प्रदीप रासकर यांनी ही माहिती दिली आहे. शिवसेना-भाजपने आज रत्नागिरी जिल्हा बंद पुकारला. या बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. रत्नागिरी आणि परिसरातील दुकानं बंद आहेत.

रत्नागिरीत शिवसैनिकांनी रस्त्यावर टायर पेटवून पोलिसांच्या दडपशाहीचा निषेध केला. त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यात तणावाचे वातावरण निर्माण झालंय. तर दुसरीकडे रत्नागिरी जिल्हा रुग्णालयातही तणावाची परिस्थिती आहे. काल पोलिसांच्या गोळीबारात ठार झालेला तबरेज सेहकर याच्या मृतदेहाचे पोस्टमार्टम करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करत जमाव पोस्टमार्टम रुममध्ये घुसला. तबरेझचे आई, वडील आणि नातेवाईक उपस्थित नसताना ही पोस्टमार्टम करण्याचा प्रयत्न केल्याचं जमावाचं म्हणणं होतं. यावेळी हॉस्पिटलच्या कर्मचार्‍याला जमावाने मारहाणही केली.

दरम्यान, शिवसेना आमदार परशुराम उपरकर, गजानन किर्तीकर यांच्यासह शिवसैनिकांनी हॉस्पिटलमध्ये जाऊन अधिकार्‍यांशी चर्चा केली. प्रांताधिकारी अजित पवार यांना निलंबित करावे अशी मागणी गजानन किर्तीकरांनी केली. तर साखरीनाटे भागातील मच्छिमारांची बैठक झाली त्या बैठकीत शांतता पाळण्याचे आवाहन करण्यात आलं. मात्र जोपर्यंत गोळीबाराचे आदेश देणार्‍या अधिकार्‍यांविरुध्द कारवाई होतच नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचे त्यांच म्हणणं आहे.

close