नागपूरच्या कृषी उत्पन्न समितीची इमारत तोडण्याचा प्रयत्न

April 20, 2011 3:20 PM0 commentsViews: 5

20 एप्रिल

नागपूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीची इमारत तोडण्याचा प्रयत्न नागपूर सुधार प्रन्यासन केला आहे. मात्र काँग्रेस नेते नाना गावंडे आणि जिल्हा परिषद अध्यक्ष सुरेश भोयर यांनी विरोध करत ही कारवाई थांबवली. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या ताब्यात असलेली ही जागा नागपूर सुधार प्रन्यासनं महानगरपालिकेला दिली होती. महापालिकेनं ही जागा भाडेपट्टीवर बाजार समितीला दिली. ही जागा गेल्या पन्नास वर्षांपासून बाजार समितीच्या ताब्यात आहे. मात्र आता शेतकर्‍यांसाठी असलेल्या या जागेवर बजेट हॉटेल बांधण्याची नासुप्रची योजना आहे. महत्वाचे म्हणजे या इमारतीत अनेक शासकीय कार्यालय ही आहेत.

close