विवेक पंडित यांच्यासह आंदोलनक पोलिसांच्या ताब्यात

April 20, 2011 3:25 PM0 commentsViews: 4

20 एप्रिल

वसईचे आमदार विवेक पंडित यांच्यासह लाँग मार्चमध्ये सहभागी झालेल्या आंदोलकांना पोलिसांनी वरळी सी लिंक जवळ ताब्यात घेतलं आहे. तर इतर आंदोलकांना ताब्यात घेऊन आग्रीपाडा पोलीस स्टेशनमध्ये नेण्यात आल्याचं कळतंय. मात्र सर्व आंदोलनकर्त्यांनी पोलीस स्टेशनमध्येच उपोषण सुरू केलं आहे. वरळी पोलीस स्टेशनमध्ये आंदोलकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वांद्रे सी-लिंकची सुरक्षा तोडली, चक्का जाम केला आणि कायदा – सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण केला म्हणून आंदोलकांवर गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, विवेक पंडित यांच्यावरील कारवाईच्या निषेधात वसई महापालिकेतल्या वाघोली, नंदाखाल, निर्मळ, गास या गावात बंद पुकारण्यात आला आहे.

close