‘पृथ्वी’मध्ये ‘तू’चा प्रयोग

November 9, 2008 1:55 PM0 commentsViews: 8

9 नोव्हेंबर मुंबई ,पृथ्वी फेस्टिव्हलच्या दुस-या दिवसाचं आकर्षण होतं ते पुण्याच्या आसक्त ग्रुपच्या 'तू' या मराठी नाटकाचं आणि दिलीप प्रभावळकरांच्या लक्षवेधी अभिनयाचं. 'तू' या नाटकात पाच वेगवेगळी पात्र त्यांच्या प्रेमाच्या शोधात आपल्याला दिसतात आणि प्रेम हीच या नाटकाची थीम आहे. नाटकाला प्रभावी संगीत तर आहेच , पण या नाटकात जलालुद्दीन रूमी या सुफी संताच्या कविताही आहेत. मोहित टाकळकरने दिग्दर्शित केलेलं हे नाटक बघणा-यालाही प्रेमाची अनुभूती देतं.

close