भिवंडी महापालिकेत समाजवादीच्या कार्यकर्त्यांच्या राडा

April 20, 2011 3:28 PM0 commentsViews: 3

20 एप्रिल

भिवंडी महानगरपालिकेत समाजवादीच्या कार्यकर्त्यांनी धिंगाणा घातला. भिवंडी महापालिकेच्या सभेत माजी महापौर आणि सध्याचे नगरसेवक विलास पाटील यांच्यावर अपक्ष नगरसेवक आणि राष्ट्रवादी शहराध्यक्ष खलीद गुड्डू यांनी सध्याचे महापौरांकडून आपल्या इशार्‍याने काम करून घेत असल्याचा आरोप केला.

त्यावरून दोघांच्या समर्थकांमध्ये धक्काबुक्की झाली. याचवेळी घरपट्टी आणि पाणीपट्टीच्या खाजगीकरणाला विरोध करण्यासाठी धरणे आंदोलन करणार्‍या समाजवादी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी थेट महापालिकेत घुसून कार्यालयात तोडफोड करण्यास सुरुवात केली. ही तोडफोड करण्यात राष्ट्रवादी आणि काही बीजेपीचे कार्येकर्ते सहभागी झाले. या तोडफोडीत विलास पाटील यांची गाडीही फोडली.

close