भ्रष्टाचाराच्या विरूद्धच्या लढ्याला पाठिंबा – सोनिया गांधी

April 20, 2011 6:03 PM0 commentsViews: 1

भ्20 एप्रिल

अण्णांच्या भ्रष्टाचारविरोधी मोहिमेला बदनाम करण्यासाठी मध्यंतरी काहीजणांनी टीकेची झोड उठवली होती. याबद्दल अण्णा हजारे यांनी सोनिया गांधींना पत्र लिहून आपली नाराजी व्यक्त केली होती. आज मंगळवारी अण्णा हजारे यांच्या पत्राला सोनिया गांधींनी उत्तर दिलं आहे. सोनियांनीबदनामीच्या कटाशी माझा संबंध नाही असं या पत्रात स्पष्ट केलं आहे.

सोनिया गांधी म्हणतात, " बदनामीचं राजकारण करणार्‍यांना माझा पाठिंबा नाही. भ्रष्टाचारा विरोधातल्या माझ्या कटिबद्धतेबद्दल तुम्ही शंका घेऊ नये, लोकपाल विधेयकाला माझा पूर्ण पाठिंबा आहे. "

close