औरंगाबाद महापालिकेत गोंधळ ; अमरावतीत नगरसेवकांमध्ये फूट

April 20, 2011 3:34 PM0 commentsViews: 3

20 एप्रिल

पाणीटंचाईंच्या मुद्यावरून औरंगाबाद महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत आज प्रचंड गोंधळ उडाला. नगरेसवकांनी प्रशासनाला धारेवर धरले. यावेळी विरोधी पक्षनेते प्रमोद राठोड आणि भाजपचे गटनेते संजय केनेकर यांच्यात आधी शाब्दिक चकमक उडाली आणि नंतर त्यांच्यात धक्काबुक्कीही झाली. प्रशासनाने पाणीटंचाईला वितरण व्यवस्थेतील दोष कारणीभुत असल्याचे सागितले. मात्र नगरसेवकांच त्यावर समाधान झालं नाही. नगरसेविकांनीही सभेत प्रचंड आवाज उठविला.

तर अमरावती महानगरपालिकेच्या भाजपा नगरसेवकांमध्ये फूट पडली आहे. एकीकडे 12 तर दुसरीकडे 6 नगरसेवक आहेत. भाजपा प्रदेशाअध्यकक्ष सुधीर मुनगणटीवार यांनी 3 नगरसेवकांना निलंबित केले.त्यापैकी एक आहेत सुरेंद्र पोपली. सुरेंद्र पोपली हे अमरावती मनपा मध्ये विरोधीपक्ष नेते म्हणून काम पाहात आहेत. सुरेंद्र पोपली यांना विरोधीपक्ष नेते पदावरून हटवावे अशी मागणी भाजपा नगरसेवकांनी महापौरांकडे केली होती. आजच्या सर्व साधारण सभेत भाजपाचे नगरसेवक, महापौर आणि राष्ट्रवादिचे नगरसेवक यांच्या मध्ये खडेजंग व शाब्दिक चकमक झाली.

close