अण्णांनी युपीतील भ्रष्टाचारप्रकरणी सत्याग्रह करावा – दिग्विजय सिंग

April 21, 2011 9:29 AM0 commentsViews: 8

21 एप्रिल

भ्रष्टाचाराच्या विरोधात लढा देणार्‍या अण्णा हजारेंनी उत्तर प्रदेशातील भ्रष्टाचारप्रकरणी सत्याग्रह करावा असं आवाहन काँग्रेसचे सरचिटणीस दिग्विजय सिंग यांनी केलं. अण्णांनी जर युपीत येऊन उपोषण किंवा कुठलंही आंदोलन केलं तर काँग्रेस त्यांना सगळे कागदपत्रं पुरवील आणि सपोर्टही देईल असंही दिग्विजय सिंग यांनी म्हटलं आहे. त्याचबरोबर सरकारही अण्णांना पूर्ण सहकार्य देईल असंही दिग्विजय सिंग यांचं म्हणणं आहे. तर जनलोकपाल विधेयक पावसाळी अधिवेशनात मांडू असा पुनरुच्चार पंतप्रधान मनमोहनसिंग यांनी केलाय. भ्रष्टाचाराशी लढायला सध्याचे कायदे पुरेशी नाहीत असं मनमोहनसिंग म्हणाले.

close