मुख्यमंत्र्यांनी भरला विधान परिषदेच्या निवडणुकीचा अर्ज

April 21, 2011 9:35 AM0 commentsViews: 1

21 एप्रिल

मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी अखेर विधान परिषदेसाठी आपला निवडणूक अर्ज भरला आहे. संजय दत्त यांनी मुख्यमंत्र्यांसाठी आमदारकीचा राजीनामा दिला होता. 4 मे रोजी ही पोटनिवडणूक होणार आहे. 23 एप्रिल अर्ज भरण्याची शेवटची तारीख आहे. मुख्यमंत्र्यांची ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी काँग्रेस प्रयत्न करत आहे.

close