मुंबईत भरलयं लग्नाच्या वस्तूंच प्रदर्शन

November 9, 2008 2:30 PM0 commentsViews: 6

9 नोव्हेंबर , मुंबईशची मराठे दिवाळी संपून आता सिझन सुरू झालाय लग्नसराईचा. लग्नासाठीच्या सगळ्या वस्तूंच एकत्र प्रदर्शन भरलयं मुंबईतल्या कफ परेडच्या वर्ल्ड ट्रेड सेंटरमध्ये. या प्रदर्शनाचं आकर्षण आहे फॅशनबरोबर नवीन ट्रेंड्सच. या विवाह प्रदर्शनाचं यंदाचं सहावं वर्ष आहे. इथं उंची कपडयासोबत जयपुरी, मीनाकाम केलेले अनेक दागिने आहेत, त्यांच्या किमतीही स्वस्त आहेत.तसंच घरातील वस्तू, टूर ऑपरेटर यांचेही स्टॉल्स या प्रदर्शनात आहेत. लग्नाची एकूण एक सर्व रेडिमेंड तयारी एका छताखाली दिसते.असं असलं तरी एकूणच मंदीचा परिणाम लग्नाच्या बजेटवरही झालेला दिसतोय. त्यामुळे कमी पैशात लग्न अरेंज करून देणं वेडिंग प्लॅनर पुढेही आव्हान ठरतंय.

close