सत्यसाईबाबा यांची प्रकृती अजुनही चिंताजनक

April 21, 2011 10:41 AM0 commentsViews: 1

21 एप्रिल

अध्यात्मिक गुरू सत्यसाईबाबा यांची प्रकृती अजुनही चिंताजनक असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं आहे. बाबा उपचारांना अतिशय कमी प्रतिसाद देत आहेत. लो ब्लड प्रेशरमुळे उपचार करताना अडचण येत असल्याचे पुट्टपर्तीच्या सत्य साई सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचे संचालक डॉ. ए.एन. सफाया यांनी सांगितलं.

हॉस्पिटलच्या वतीने दररोज दोन वेळा मेडिकल बुलेटीनव्दारे बाबांच्या प्रकृतीची माहिती देण्यात येत आहे. देश-विदेशातील नामांकित डॉक्टर आणि राज्य सरकारच्या डॉक्टरांचे पथक बाबांवर उपचार करत आहेत. बाबांची प्रकृती सुधारावी यासाठी जगभरातील त्यांचे भक्त प्रार्थना करत आहे. दरम्यान त्यांच्या प्रकृतीबद्दल चिंतेत असल्याने बाबांच्या लाखो भक्तांनी पुट्टपर्तीला गर्दी केली आहे. त्यामुळे हॉस्पिटल परिसरात जमावबंदीचं 144 कलम लावण्यात आलंय.

close