डिसेंबर अखेरीस खान युध्द !

April 21, 2011 10:59 AM0 commentsViews: 2

21 एप्रिल

शाहीद कपूर जरा कन्फ्यूज दिसतोय. तो ऍक्शन फिल्म करतोय की रोमँटिक हेच कळत नाहीय आणि बॉक्स ऑफिसवर आता खान युद्धही रंगणार आहे. 2011चा ख्रिसमस हा वेगळाच असेल. कारण सगळ्यांना पाहायला मिळेल खान युद्ध. शाहरूख खानचा डॉन 2 आणि आमीर खानचा जख्मी एकाच दिवशी रिलीज होणार आहे.

आमीर खान, राणी मुखर्जी आणि करिना कपूर या तिघांच्या भूमिका सिनेमात आहेत. शाहरूख खानचा डॉन फरहान अख्तर दिग्दर्शित करतोय, तर आमीर खानचा जख्मी रीमा कागती दिग्दर्शित करतेय. दोन्ही सिनेमे फरहानच्या एक्सेल एंटरटेन्मेंटचे आहेत. त्यामुळे एकूणच डिसेंबरमध्ये पडद्यावर आणि पडद्याबाहेरही भरपूर करमणूक आहे.

तर शाहीदचा हा पहिलावहिला ऍक्शनपट. असं म्हणतात, टॉम क्रूझ आणि कॅमरॉनच्या नाइट अँड डे चा हा रिमेक आहे. अर्थात, सिनेमाचा दिग्दर्शक सिद्धार्थ आनंदनं रिमेक असल्याचं नाकबूल केलंय. तर निर्माता रमेश तोरानीच्या मते हा रोमँटिक सिनेमा आहे. प्रेक्षकांच्या समोर काय वाढून ठेवलंय ते सिनेमा रिलीज झाल्यावरच कळेल.

close