नाशकात गॅस सिलेंडरच्या स्फोटात 3 जण जखमी

April 21, 2011 2:30 PM0 commentsViews: 4

21 एप्रिल

नाशिकमध्ये घरगुती सिलेंडर लिक होऊन लागलेल्या आगीत एका कुटुंबातील तिघेजण गंभीर भाजले आहेत. पंचवटीतल्या सत्यविजय अपार्टमेंटमध्ये हा अपघात झाला. देशमाने कुटुंबातल्या विठाबाई आणि पूनम या सासूसुना यात गंभीर भाजल्या आहेत. त्यांच्यावर नाशिकच्या शासकीय रूग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. सिलेंडर लीक झाल्याने पसरलेल्या गॅसने पेट घेतल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांकडून वर्तवण्यात आला आहे.

close