अकोल्याच्या सौदळा यात्रेत बोकडबळी बंदीचे आदेश

April 21, 2011 2:15 PM0 commentsViews: 3

21 एप्रिल

अकोला जिल्हयातील सौंदळा येथील देवीच्या यात्रेदरम्यान गेली अनेक वर्ष बोकडबळी देण्याची प्रथा होती मात्र यंदा ही प्रथा बंद करण्यासाठी जिल्हाधिकार्‍यांनी प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहे. त्यानंतर या संपूर्ण परिसराला छावणीचं रुप प्राप्त झालंय. मोठ्या प्रमाणावर पोलीस ताफा येथे तैनात करण्यात आला आहे. मंदिर व मंदिराच्या 200 मीटर परिसरात प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आला आहे. 150 पोलीस कर्मचारी आणि 35 महिला पोलीस तैनात करण्यात आले आहेत. या बंदीनंतर बोकडबळींचे प्रमाण आता इथे नगण्य आहे.

close