काँग्रेस हायकमांडची नेत्यांना तंबी !

April 22, 2011 9:18 AM0 commentsViews: 2

22 एप्रिल

लोकपाल विधेयकासाठी झालेल्या आंदोलनाबाबत, आणि लोकपाल मसुदा समितीतल्या जनप्रतिनिधींबाबत जाहीर वक्तव्य करु नका अशी तंबी काँग्रेस हायकमांडनी काँग्रेसच्या नेत्यांना दिली आहे. गेल्या काही दिवसात काँग्रेसचे नेते, लोकपाल समितीतल्या जनप्रतिनिधींवर आरोप करत आहे. यामध्ये दिग्विजय सिंग, कपिल सिब्बल आघाडीवर आहेत. काँग्रेस नेत्यांच्या या वक्तव्यावर अण्णा हजारेंनी नाराजी व्यक्त केली होती. त्याबाबत त्यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींना पत्रही लिहिलं होतं. त्यावर सोनिया गांधींनी अण्णांना पत्रं लिहून त्याची दखल घेऊ असं सांगितलं होतं.

close