शिर्डी संस्थान विश्वस्त मंडळावरुन विरोधकांमध्ये जुंपली

April 22, 2011 11:04 AM0 commentsViews: 5

22 एप्रिल

शिर्डी संस्थानच्या विश्वस्त मंडळावरुन शिर्डीमध्ये राधा कृष्ण विखे पाटील यांच्या विरोधी राजकारण पेटले आहे. विश्वस्त मंडळाची तीन वर्षांची कालमर्यादा झाल्यावरही गेल्या सात वर्षांपासून विखे पाटलांच्या समर्थकांचे वर्चस्व साई संस्थानावर आहे. हे विश्वस्त मंडळ बरखास्त करावे या मागणीसाठी शिवसेना भाजपसह राष्ट्रवादी सुद्धा विखेंच्या विरोधात उतरली आहे. दुसरीकडे विखेंच्या समर्थकांनीही विरोधकांचा निषेध केला आहे. दोन्ही गटाकडून एकमेकांच्या प्रतिमाचे दहन करण्यात आलं आहे. शिर्डीच्या विकासासाठी आलेले 62 कोटी रुपये कुठे गेले हा सवाल विरोधक करत आहे.

close