‘देशद्रोही’ चित्रपटाला मनसेकडून क्लीन चीट

November 9, 2008 3:16 PM0 commentsViews: 4

9 नोव्हेंबर, मुंबई' देशद्रोही ' सिनेमा दाखवायचा का नाही, हे ठरवण्याकरता सेन्सॉर बोर्ड आहे. कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही, याची काळजी पोलीस घेतील, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी पुण्यात पत्रकारांशी बोलताना दिली. अभिनेता आणि निर्माता कमाल खान यांचा 'देशद्रोही' सिनेमा मुंबईत प्रदर्शित करायचा का नाही, यावर सध्या सरकारदरबारी प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. पण खुद्द मुख्यमंत्र्यांनी ह्या सिनेमात काही आक्षेपार्ह असल्यास मुंबई पोलीस हा सिनेमा पाहून काय तो निर्णय घेतील, अशी माहिती पत्रकारांना दिली. दरम्यान, मनसेनं या चित्रपटाला क्लिनचीट दिली आहे. मनसेच्या विधी विभागाच्या अखिलेश चौबे आणि त्यांच्या सहकार्‍यांनी अंधेरीच्या एका चित्रपटगृहात हा चित्रपट पाहिला. या चित्रपटात काहीही आक्षेपार्ह नसल्याचं त्यांनी सांगितलं. त्याचबरोबर याबाबत मनसे काय भुमिका घेणार हे उद्या सांगणार असल्याचं ते म्हणाले. सेन्सॉर बोर्डाने मुळ चित्रपटात काही फेरफार सुचवून हा चित्रपट प्रदर्शनासाठी मंजूर केला होता. त्यानंतर मनसेनं मात्र चित्रपटाच्या जाहिराती प्रक्षोभक असल्याचं सांगत या चित्रपटाच्या प्रदर्शनाला हरकत घेतली होती. मनसेच्या सिनेवर्कर्स असोसिएशननं हा चित्रपट पाहिल्यानंतरच या संदर्भात आपली भूमिका ठरेल, असं सांगितलं होतं.

close