विजयाची नशा ट्राफीने उतरवली

April 22, 2011 11:41 AM0 commentsViews: 3

22 एप्रिल

ट्रॉफी जिंकल्याचा आनंद केवळ काही क्षण टिकला आणि नंतर मावळला. हे सगळं घडलं त्या ट्रॉफीमुळेच. त्याचं झालं असं फेमस फुटबॉल प्लेअर क्रिस्टियानो रोनाल्डोच्या विनिंग गोल मुळे रियल मादि्रदने बार्सिलोनाला हरवत ''कोपा डेल रे ''ही ट्रॉफी तब्बल 18 वर्षांनी दिमाखात जिंकली.

ही 15 किलोची ट्रॉफी घेऊन रिअल मादि्रदच्या टीमची त्यांच्या चाहत्यांनी ओपन रुफ बसमधून मिरवणूक काढली. पण इथच दुदैर्वं आडवं आलं. ती ट्रॉफी हातात घेऊन मिरवत असतानाच हातातून निसटली आणि खाली पडली. ऐन मिरवणूकीच्या भरात बसखाली येऊन ही ट्रॉफी चिरडली गेली आणि तिचा चेंदामेंदा झाला. जवळ जवळ 60,000 स्पॅनीश फुटबॉल प्रेमी ही मिरवणूक बघायला आले होते. पण या घटनेनं सगळ्यांचीच निराशा झाली.

close