मुख्यमंत्र्यांचा बिनविरोध निवडून येण्याचा मार्ग मोकळा

April 22, 2011 6:26 PM0 commentsViews: 3

22 एप्रिल

मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी काल गुरूवारी विधान परिषदेच्या पोटनिवडणुकीसाठी अर्ज भरला होता. आता त्यांच्या विरोधात शिवसेना उमेदवार उभा करणार नाही असा संकेत उद्धव ठाकरेंनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटलंय. पृथ्वीराज, बिनविरोध निवडून या अशा मथळ्याखाली उद्धव ठाकरे यांनी एक पत्रक प्रसिद्धीस दिलंय. त्यामुळे आता मुख्यमंत्र्यांचा विधान परिषदेवर बिनविरोध निवडून येण्याचा मार्ग मोकळा झाला असं बोललं जातंय.

भाजपचीही हीच भूमिका आहे यासंदर्भात गोपीनाथ मुंडे आणि उध्दव ठाकरे यांची बोलणी झाली आहे. केवळ औपचारिकता म्हणून निवडणुक लढवायची नाही. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या विरोधात उमेदवार उभा करणार नाही. असा शिवसेना भाजप युतीचा निर्णय असल्याचे गोपीनाथ मुंडेंनीही म्हटलंय. पण मुख्यमंत्र्यांनी मागच्या दाराने निवडून जाण्यापेक्षा लोकांमधून निवडून जायला हवे होते असं सांगायलाही गोपीनाथ मुंडे विसरले नाहीत.

close