मलिंगाची टेस्ट क्रिकेटमधून निवृत्ती

April 22, 2011 12:15 PM0 commentsViews:

22 एप्रिल

श्रीलंकेचा फास्ट बॉलर लसिथ मलिंगाने टेस्ट क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. आपल्या अचूक यॉर्करसाठी प्रसिध्द असलेल्या मलिंगाला सध्या गुडघ्याच्या दुखापतीने सतावलंय. यामुळे इंग्लंड दौर्‍यातही मलिंगाची निवड करण्यात आलेली नाही. दुखापतीमुळे आपल्याला टेस्ट क्रिकेटमध्ये खेळता येणार नसल्याचे मलिंगाने श्रीलंका क्रिकेट बोर्डाला कळवलं होतं.

पण दुखापतीचे कारण देणारा मलिंगा आयपीएलमध्ये मात्र खेळतोय. त्यामुळे वाद निर्माण झाला होता. दुखापतीतून सावरण्यासाठी श्रीलंकनं क्रिकेट बोर्डाने मलिंगाला मायदेशी बोलावलं होतं. पण आज अचानक मलिंगाने आपली निवृत्ती जाहीर केली. मलिंगाने टेस्ट क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असली तरी वन डे आणि टी-20 क्रिकेटमध्ये मात्र तो खेळणार आहे. 2012 मध्ये होणार्‍या टी-20 वर्ल्ड कप आणि 2015ला होणार्‍या वर्ल्ड कपमध्ये खेळण्याची इच्छा मलिंगाने व्यक्त केली.

लसिथ मलिंगाच्या टेस्ट कारकीर्द

मलिंगाने 2004 मध्ये ऑस्ट्रेलिया विरुध्द टेस्ट क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. आपल्या पहिल्याच मॅचमध्ये मलिंगाने 6 विकेट घेतल्या होत्या. यानंतर मलिंगा श्रीलंकेतर्फे तब्बल 30 टेस्ट मॅच खेळला आणि यात त्याने 101 विकेट घेतल्या आहेत. 50 रन्समध्ये पाच विकेट ही त्याची टेस्ट क्रिकेटमधली सर्वोत्तम कामगिरी ठरली आहेत. 2010 मध्ये भारताविरुध्द मलिंगला शेवटची टेस्ट मॅच खेळला.

close