नाशकात वसुंधरा दिनानिमित्त सायकली रॅलीचं आयोजन

April 22, 2011 1:02 PM0 commentsViews: 5

22 एप्रिल

वसुंधरा दिनानिमित्ताने नाशिककरांनी 'इको ड्राईव्ह'अर्थातच 'सायकल रॅली' चा आगळावेगळा उपक्रम हाती घेण्यात आला होता. यानिमित्ताने पाच हजार सायकल खरेदी करण्याचा नाशिककरांचा संकल्प आहे. आज सकाळी सात वाजता नाशिकच्या हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावरुन या इको ड्राईव्ह मोहिमेला सुरवात झाली. शेकडो नाशिककरांनी सायकलवरुन रॅली काढली. विविध क्षेत्रातील मान्यवर या रॅलीमध्ये सहभागी झाले होते.या निमित्तानं प्रदुषण टाळण्याचा संदेश देण्यात आला.

close