वनमंत्र्यांचा ‘मला माहित नाही’चा सुर

April 22, 2011 2:16 PM0 commentsViews: 2

22 एप्रिल

जागतिक वसुंधरा दिनाच्या निमित्त आज पुण्यामध्ये वनमंत्री पतंगराव कदम यांनी जागरुकता दाखवत आपण काय काम करतोय हे सांगण्यासाठी पत्रकार परिषद बोलावली. भिगवणच्या फ्लेमिंगो आणि मायग्रेटेड पक्षी येणं कमी होत आहेत त्याबद्दल तुम्ही काही करणार का असं विचारल्यावर त्यांनी सोलापूर मध्ये आम्ही माळढोक पक्षांबद्दल मोठं काम केलंय पण हे भिगवणचं काय मला माहत नाही असं सांगुन टाकलं.

त्यानंतर तेथील वनअधिकारी अलोक जोशी यांनी भिगवणचा समावेश केंद्र सरकारनी निवडलेल्या महाराष्ट्रातील तीन प्रमुख वेटलैंड्स मध्ये झाला असुन तिथे काय करता येईल या दृष्टीनी अभ्यास सुरु असल्याचं सांगितलं. खरंतर वसुंधरा दिनाच्या निमित्ताने आपण आणि आपलं खातं किती जागरुक आहोत हे दाखवण्याचा पतंगरावांचा प्रयत्न होता पण पत्रकार परिषदेत मात्र उलटाच प्रकार दिसला.

close