आदिवासींचा वृक्षमित्र आणि वनविभागाच्या कर्मचार्‍यांवर हल्ला

April 22, 2011 2:23 PM0 commentsViews: 1

22 एप्रिल

जळगाव जिल्ह्यातील यावल विभागातल्या वागझीरा वनक्षेत्रात वनविभागाच्या कर्मचार्‍यांवर आणि वृक्षमित्र बाबा महंत यांच्यावर सुमारे 100 ते 150 आदिवासींनी हल्ला केल्याची घटना घडली आहे. या हल्ल्यात वनविभागाच्या कर्मचार्‍यांसह बाबा महंत गंभीर जखमी झाले आहेत. सातपुड्यात वनजमिनी बळकावण्यासाठी आदिवासींनी बेसुमार वृक्षतोड सुरू केली.

ही वृक्षतोड रोखण्यासाठी आज वनविभागाचे काही कर्मचारी आणि वृक्षप्रेमी तिथे पोहचले आणि त्यांनी वृक्षतोडीला विरोध करण्याचा प्रयत्न केला असता सुमारे 100 ते 150 आदिवासींच्या समुहाने त्यांच्यावर हल्ला केला. लाठ्या-काठ्या, कुर्‍हाडीनं केलेल्या हल्ल्यात वन विभागाचे कर्मचारी आणि बाबा महंत गंभीर जखमी झाले आहेत.

close