घोटावडे फार्महाऊस प्रकरणीशी कोणताही संबंध नाही – अजित पवार

April 22, 2011 2:31 PM0 commentsViews: 5

22 एप्रिल

घोटावडे फार्महाऊस प्रकरणी अजित पवार आणि सुनेत्रा पवार यांना पुणे दिवाणी न्यायालयाने प्रतिवादी केल्यानंतर या प्रकरणावर खुलासा करताना अजित पवार यांनी या प्रकरणाशी आपला आणि आपल्या पत्नीची कसलाही संबंध नाही. आपण जमीन खरेदी केलेली नाही अगर धमकावलेही नाही असं सांगून येत्या सोमवारी वकीलामार्फत न्यायालयात म्हणणे मांडू असं सांगितलं आहे.

अजित पवार पुण्यात पत्रकार परिषदेत बोलत होते. पुण्याजवळील मुळशी तालुक्यातील घोटावडे येथील फार्महाऊस प्रकरणी आपली फसवणूक करून 26 गुंठे जमीन बळकावल्याचा आरोप चंद्रकांत गुंडगळ या शेतकर्‍याने रघुनाथ तापकिर यांच्यावर केला होता. संबंधीत फार्महाऊस अजित पवारांची पत्नी भागीदार असलेल्या फायर पॉवर ऍग्रो कंपनीचे असल्याने अजित पवार दबाव टाकतायत असा आरोप करत गुंडगळ यांनी दिवाणी खटला केला. पण आपला या प्रकरणाशी संबंध नसल्याचा खुलासा अजित पवारांनी केला.

तर रायगड जिल्ह्यातील कर्जत येथील बिलवली धरणाजवळची जागा ए.जी मर्कंटाईल कंपनीशी देण्याच्या प्रकरणी अजित पवारांनी आपण सभागृहात म्हटल्याप्रमाणे चौकशीला तयार आहोत असं अजित पवारांनी पुण्यात स्पष्ट केलं. तसेच आपल्यावर आरोप करणार्‍या देवेंद्र फडणवीसांच्या अध्यक्षतेखालील चौकशी नेमावी असं आपण सांगितलं पण फडणवीसांनीच गयावया करत नको आपल्याला चुकीची कागदपत्र दिली असतील असं ही अजितदादा म्हणाले.

दरम्यान शेतीचे पाणी उद्योगाला देण्यावरून जलविधेयकाच्या निमित्ताने अजित पवारांना लक्ष्य करणार्‍या विखे पाटील पाटील पितापुत्रांवर अजित पवारांनी पलटवार केला. सोफीया प्रकल्पाला एमआयडीसीने जागा दिली आहे. एमआयडीसी खातं उद्योग मंत्र्याकडे आहे. आणि1999 पासून उद्योग मंत्री काँग्रेसचा आहे. मंत्रिमंडळाच्या उपसमितीमधे काँग्रेस- राष्ट्रवादी दोन्ही पक्षांचे मंत्री आहेत मग मलाच का लक्ष्य केलं जातंय असं सांगत अजित पवारानी जल विधेयकावरून होणार्‍या टीकेला उत्तर दिलं.

close